Breaking News
टीम इंडियामधील चार सरप्राईज चेहऱ्यांची चर्चा
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी 24 मे (शनिवार) रोजी भारतीय संघ आणि नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा करण्यात आली. 18 सदस्यीय संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलची कर्णधारपदी नियुक्ती भारतीय क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे. फेब्रुवारी 2022 पासून भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहितसोबतच, त्याचे सहकारी विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनीही कसोटी क्रिकेटला निरोप दिला आहे. आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शन आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. करुण नायरची 2017 नंतर संघात वापसी झाली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे