Breaking News
कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट, टोल नाक्याला लागली भीषण आग
कोल्हापूर - कोल्हापूर कागल रस्त्यावर कोगनोळी टोल नाक्यावर एका कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने टोल नाक्यावरील दोन बूथ जळून खाक झाले, यात जीवितहानी मात्र झाली नाही. कंटेनर चालकाने वेळीच उडी मारून बचाव करुन घेतला.
टोलनाक्याच्या लेन मधून बेळगावहून मुंबईकडे जाणारा मालवाहू कंटेनर टोलवर आला. यावेळी डिझेल टाकीचा स्फोट होऊन आग कंटेनरच्या पुढील बाजूस भडकली. आगीने नाक्यावरील दोन टोल बूथ ना (केबिनना) कवेत घेतले. कर्मचाऱ्यांनी वेळीच दुतर्फा बॅरिकेड्स लावून पोलिसांसह
अग्निशामक दलाला पाचारण केले आणि रहदारी रोखून धरली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अग्निशामक दलाने शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant