NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

संजय राठोड यांच्या उपस्थितीत सामुदायिक कन्या विवाह

संजय राठोड यांच्या उपस्थितीत सामुदायिक कन्या विवाह

उत्तर प्रदेश-सर्वजातीय नायक विशाल सामूहिक कन्या विवाह महायज्ञ आज संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडला. जैतपूर (औरैया) येथील हनुमान धाम, साहब नगर, उत्तर प्रदेश येथे जन संघर्ष मंचच्या मार्गदर्शनाखाली सहावा सर्वजातीय नायक विशाल सामूहिक कन्या विवाह महायज्ञ आज 23 मे 2025 रोजी भव्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या महायज्ञात विविध समाजघटकातील वधू-वरांचे विवाह धार्मिक विधींसह पार पडले.हा सोहळा केवळ विवाह कार्यक्रम नव्हता, तर तो सामाजिक समरसतेचा, एकतेचा आणि संस्कारांचा एक महायज्ञ ठरला. आजच्या सामाजिक वातावरणात जिथे द्वेष आणि भेदभावाच्या घटना वाढत आहेत, तिथे या प्रकारचे सामूहिक उपक्रम सामाजिक ऐक्य व सुधारणेचे प्रेरणास्थान बनतात. संजय राठोड यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “मी स्वतः बंजारा नायक समाजाचा एक भाग आहे, आणि मला याचा अभिमान आहे.” बंजारा समाजाने व्यापार, सेवा व राष्ट्रनिर्माणात मोलाचा वाटा उचलला आहे.

आज या समाजातील युवक-युवती शिक्षण, प्रशासन, उद्योजगिरी, कला व सामाजिक कार्यामध्ये आपली छाप पाडत आहेत.देशभरातील सर्व राज्यांमध्ये नायक समाजाने हक्क, न्याय व ओळखीसाठी संघर्ष केला आहे. आज समाज संघटन, शिक्षण व नेतृत्वाच्या जोरावर पुढे जात आहे. समाजाची सामाजिक व राजकीय जाणीव अधिक ठळक होत आहे. संत सेवालाल महाराज, सामतदादा, रूपसिंह महाराज, लकिशाह बंजारा या थोर संतांनी समाजाला एक ओळख, एक संस्कृती दिली आहे.

समाजाची बोलीभाषा, पारंपरिक पोशाख, तांडा संस्कृती आणि कला ही आपली खरी ओळख आजही टिकून आहे.संजय राठोड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये पोहरादेवी-उमरी (बंजारा काशी) चे विकास प्रकल्प, गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना, मुंबईत बंजारा सेवा भवनसाठी 5600 चौ. मी. जमीन, संत सेवालाल महाराज जयंतीस शासकीय दर्जा, आणि वनार्टी संस्था (वसंतराव नाईक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्र) यांचा समावेश होतो. *राष्ट्रीय पातळीवरील समाजाच्या पुढील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या आहेत:*

1. One Nation, One Category, One Reservation

2. बंजारा भाषेला संविधानाच्या आठव्या अनुसूचीत समावेश

3. राष्ट्रीय बंजारा साहित्य अकादमीची स्थापना

4. प्रत्येक राज्यात बंजारा भवनासाठी जमीन उपलब्ध करून देणे

5. संत सेवालाल महाराज जयंतीस राष्ट्रीय पातळीवर मान्यता

6. बंजारा विकास मंत्रालयाची स्थापना

7. 20,000 कोटींच्या निधीसह राष्ट्रीय तांडा विकास महामंडळ स्थापन करणे.

आजच्या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली:आमदार गुडिया कठेरिया (सदर क्षेत्र), डॉ. सर्वेश कठेरिया (जिल्हाध्यक्ष भाजपा), मुलायम सिंग नायक (कार्यक्रम अध्यक्ष), अबहर सिंग नायक (माजी राज्यमंत्री), राघव मिश्रा (नगरपंचायत अध्यक्ष), सर्नाम सिंग नायक (अध्यक्ष – लाखा बंजारा संघटन), राकेश नायक (उद्योजक – नोएडा) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंगल नायक, दिनेश नायक, संतकुमार नायक आणि त्यांच्या समर्पित टीमने केले. त्यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरला.हा महायज्ञ सामाजिक समरसता, बंधुता आणि संस्कृती जपणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरला. संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेमुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट