Breaking News
अन् सर्व राज्याना ७ मे ला ब्लॅक आउट चे निर्देश
भारत-पाकिस्तान युद्ध अटळ; ७ मे ला देशभरात ब्लॅकआऊट अन्…, गृहमंत्रालयाचा आदेश तरी काय?
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्या आहेत. युद्धाभ्यास केला जात आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत देखील महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आता या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ मे रोजी ब्लॅक आउट आणि मॉक ड्रिल व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारत पाकिस्तानवर निर्वाणीचा घाव घालण्याची शक्यता वाढली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ तारखेला सायरन वाजवण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्यावेळेस हवाई हल्ला होतो त्यावलेस सायरन वाजवला जातो. सर्व यंत्रणांची सुसज्जता तपासण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल आणि सायरन वाजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहालगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे केंद्र सरकारचे हे निर्देश अत्यंत महत्वाचे समजले जात आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant