Breaking News
Press Freedom Index मध्ये भारत 151व्या स्थानी
पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RWB) द्वारे २०२५ च्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत १८० देशांपैकी १५१ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी या यादीत भारता १५९ व्या क्रमांकावर होता.
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अमेरिकेतील प्रेसची स्थिती बिकट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या निर्देशांकात अमेरिका ५७ व्या क्रमांकावर आहे, तर गेल्या वर्षी त्याचे रँकिंग ५५ होते.
अहवालात म्हटले आहे की, अनेक देशांमध्ये माध्यमांवर राजकीय नेत्यांचे नियंत्रण असते. लेबनॉन, भारत, आर्मेनिया आणि बल्गेरिया सारख्या देशांमध्ये, राजकारणी आणि व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या सशर्त निधीमुळे माध्यमे टिकून आहेत.
इरिट्रिया या निर्देशांकात तळाशी आहे आणि नॉर्वे वरच्या क्रमांकावर आहे. भूतान, पाकिस्तान, तुर्की, पॅलेस्टाईन, चीन, रशिया, अफगाणिस्तान, सीरिया आणि उत्तर कोरिया हे भारताच्या खाली ठेवण्यात आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant