Breaking News
चंद्रपुरात उन्हाच्या तडाख्याने बदलविले शाळामहाविद्यालयाचे वेळापत्रक
चंद्रपूर - उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसू लागल्याने जिल्हाभरातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाविद्यालयांनी वेळांत बदल करून सकाळी १० वाजेपर्यंतच वर्ग सुरू ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. परीक्षा सकाळच्या सत्रात घ्यावात. उष्णता लाटेच्या स्थितीनुसार विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, मंगळवारी चंद्रपूरचे तापमान 0.2 अंशांनी वाढून देशातून सर्वाधिक 45.8, तर ब्रह्मपुरीत 45.2 अंश
सेल्सिअस एवढी नोंद झाली. उन्हाच्या तडाख्याने नागरिकांनी दुपारच्या सुमारास घरांतच राहणे पसंत केल्याचे दिसून आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही वेळापत्रकात बदल केले. योग्यता प्रमाणपत्रासाठी बाबूपेठ-बल्लारपूर बायपास रोड येथील होणारी तपासणी आणि कार्यालयातील पक्की अनुज्ञप्ती चाचणी आजपासून सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसेच दुपारी 4 ते 6:30 वाजेपर्यंत करण्यात येईल. ज्यांनी वाहन 4.0 या वाहन प्रणालीवर वेळा घेतल्या त्यांनाही हीच वेळ लागू असणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे