Breaking News
विदर्भातील या विमानतळावर पुन्हा सुरु होणार नाईट लँडींग
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर नाइट लॅन्डिंगची सुविधा इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम यंत्रणा काढल्याने बंद झाली होती. ही यंत्रणा आता पूर्ववत लावण्यात आली असून सर्व हवामान ऑपरेशन आणि इंन्सट्रूमेंट फ्लाइट रूल्स (आईएफआर) करिता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने परवानगी दिली आहे. त्यामुळे कमी दृश्यतामान व खराब वातावरणात आणि रात्रीच्या वेळेस बिरसी विमानतळावर विमान उतरविणे शक्य होणार आहे.
आता वातावरण खराब असले तरी बिरसी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) द्वारे सर्व हवामान ऑपरेशनची परवानगी मिळाली आहे. तसेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने या विमानतळावर रात्री सुद्धा विमान उतरविणे शक्य झाले आहे. यामुळे बिरसी विमानतळा वरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुद्धा बळ मिळणार आहे.
ही यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल, भारतीय विमान प्राधिकरण व्यवस्थापन व बिरसी विमानतळ येथील अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अनेकदा वातावरणात बदल होत असतो. अशावेळी बिरसी विमानतळावर विमान उतरवायचे की नाही असे प्रसंग अनेकदा निर्माण झाले होते. पण आता यावर कायम स्वरूपी मार्ग निघाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant