NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लोकअदालतमधून झाली ग्रामपंचायतींची कोट्यवधीची वसुली

लोकअदालतमधून झाली ग्रामपंचायतींची कोट्यवधीची वसुली

अहिल्यानगर - लोक अदालत या उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची कोट्यवधींची थकबाकी वसुल झाल्याच्या माहिती समोर आली आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आयोजित केलेल्या लोक अदालतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुलीचे विक्रमी संख्येने दाखलपूर्व दावे सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंतच्या लोक अदालतमधील प्रकरणांमध्ये उच्चांकी थकबाकी वसुली ग्रामपंचायतींना मिळाली आहे. एकूण ८ कोटी ५६ लाख २७ हजार ८४४ रुपयांच्या वसुलीचे झाले आहेत.

घरपट्टी, पाणीपट्टीसह गाळेभाड्याच्या वसुलीचा त्यामध्ये समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेने आज जाहीर केली आहे. मार्चअखेरीच्या कालावधीत ग्रामपंचायतींची वसुलीसाठी मोहीम सुरू असतानाच उत्पन्नात भर घालणारी मोठी वसुली याच दरम्यान झाली आहे. त्यामुळे ग्रामनिधीत भरपडून ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती मिळणार आहे.

जिल्ह्यातील १३२३ पैकी ११३९ ग्रामपंचायतींनी लोक अदालतमध्ये सहभाग नोंदवला. लोक अदालतीच्या नोटिसा थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील १३२३ ग्रामपंचायतींचे ७ लाख २ हजार ९२२ खातेदार आहेत. त्यातील ९५ हजार ७५१ खातेदार थकबाकीत आहेत. त्यांच्या थकबाकी वसूलीचे दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यात आले होते. यातील ८४ हजार ११५ नोटीसा जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने थकबाकीदारापर्यंत अल्पावधीत पोहोचवल्या होत्या. यातील ५१ हजार १९७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सर्व करांचा मिळून ८ कोटी ५६ लाख १७ हजार ८४४ रुपयांची थकबाकी वसुल झाली आहे.

लोक अदालतच्या माध्यमातून वसुलीसाठी जिल्हा परिषदेने यंदा थकबाकीदारांपर्यंत नोटीसा पोहचवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्याच्या परिणामातून आतापर्यंतची विक्रमी थकबाकी वसुली झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट