Breaking News
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात अभिवादन
मुंबई, - विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant