महिला उद्योजिका मोहिनी पुजारी यांना "मणिकर्णिका अवार्ड २०२४" स्टार्टअप सन्मान
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : व्ही केअर वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) ही एक सामाजिक संस्था असून गेल्या १३ वर्षापासून शैक्षणिक क्रीडा, बेरोजगारी, वैद्यकीय, अपंगत्व आणि समाजातील अनेक घटकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. गेल्या १३ वर्षात व्ही केअर वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) तर्फे रुग्णांना वैद्यकीय मदत, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय सुरू करून देणे इत्यादी उपक्रम राबवित असून या संस्थेच्या माध्यमातून पार पडलेल्या "मणिकर्णिका अवॉर्ड २०२४" स्टार्टअप महिला उद्योजिका म्हणून मोहिनी पुजारी यांचा सन्मान करण्यात आला.
स्टे-फाइन फॅमिलीच्या ३ वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश आल्यामुळे आज कंपनीच्या संचालिका मोहिनी पूजारी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज "नारी प्रोटेक्ट ॲनिअन सॅनिटरी नॅपकिन" ब्रांडमुळे हा मानाचा महिला उद्योजकांचा सन्मान एकूण २ हजार ८७० महिला नामांकनातून टॉप ३० महिला उद्योजिकांमध्ये समावेश होऊन "मणिकर्णिका अवार्ड २०२४ " स्टार्टअप महिला उद्योजिका म्हणुन प्रिन्स "क्राऊन" सोबत सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते मोहिनी पुजारी सन्मानित करण्यात आले.
सन्मान सोहळ्यात आपले मनोगत मांडताना मोहिनी पुजारी यांनी "मणिकर्णिका २०२४" या मिळालेल्या सन्मानाबद्दल संपूर्ण स्टेफाईन फॅमिलीचे आभार मानले आहेत. आजपर्यंत एक लाखापेक्षा जास्त महिलांसाठी कॅन्सरमुक्त महिला, प्लास्टिकमुक्त सॅनिटरी नॅपकिन तसेच महिलांसाठी स्वावलंबी अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचता आले. जवळ-जवळ १५००० पेक्षा जास्त महिलांना स्वयं व्यावसायिक बनविण्यात मोठे यश प्राप्त झाले. आपल्या या यशामध्ये सोबत काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुढे स्टेफाईनचे घोषवाक्य "स्टेफाईन की नारी, सब पे भारी!!" असे उदगार काढून त्यांनी यापुढे सुद्धा आपल्या सहकाऱ्यांसोबत अनेक शिखरे यशस्वीपणे गाठणार असल्याचे सूचक विधान केले.
आज समाजातील असाच एक घटक म्हणजेच महिला उद्योजिका, महिला उद्योजिकांना राज्य पातळीवर ओळख निर्माण करून देणे तसेच त्यांच्या उद्योगाला गतिमान करणे हा हेतू लक्षात ठेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यवसायाला गगन भरारी देण्यासाठी महाराष्ट्रातील नावाजलेली मॅजिकल चारमंट ह्या सर्टिफाइड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सोबत प्रिंट मीडिया पार्टनर लोकमत आणि कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच यांना सोबत घेऊन "मणिकर्णिका २०२४" सन्मान सोहळा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई येथे वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पार पडला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर