Breaking News
पंचविशीनंतर विवाहास मनाई,
मुंबई - जपानच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याने महिलांना वयाच्या २५ वर्षांनंतर विवाह करण्यावर बंदी घालण्याची आणि वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचे गर्भाशय काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रस्ताव देशातील वृद्ध लोकसंख्या आणि समस्यांवर सुरू असणाऱ्या एका चर्चेचा भाग म्हणून मांडण्यात आल्याचे नेत्याने सांगितले. घटत्या जन्मदराचा परिणाम म्हणून जपानला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी सरकार विविध उपाय शोधत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते नाओकी हयाकुटा यांना त्यांच्या वक्तव्यासाठी टीकांचा सामना करावा लागला,
नेमका वाद काय?
८ नोव्हेंबरला एका यूट्यूब व्हिडीओमध्ये प्रख्यात लेखक आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते नाओकी हयाकुटा यांनी देशाचा जन्मदर वाढवण्याच्या मार्गांबद्दल बोलताना धक्कादायक टिप्पणी केली. महिलांना वयाच्या २५ वर्षांनंतर लग्न करण्यास प्रतिबंधित करण्यात यावे आणि ३० व्या वर्षी हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढण्याची प्रक्रिया)करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, असे केल्याने घटणारा जन्मदर पूर्ववत होईल आणि त्यांना मुले होण्यास प्रोत्साहन मिळेल. अधिक मुले होण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी १८ वर्षांच्या वयानंतर महिलांना महाविद्यालयात जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावे, असेदेखील त्यांनी उपाय म्हणून सुचवले. २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी राष्ट्रीय प्रसारक एनएचकेच्या मंडळावर नाओकी हयाकुटा यांची नियुक्ती केली होती. या संस्थेच्या संपादकीय स्वातंत्र्य आणि धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या वेळी त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे