NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

संजय केळकर यांच्याविरोधात बंडखोरी होणार असल्याचे संकेत

संजय केळकर यांच्याविरोधात बंडखोरी होणार असल्याचे संकेत 

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील सर्वंच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीमधून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून ठाणे शहर विधानसभेतून (Thane Vidhan Sabha) विद्यामान आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटने नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघात कोणालाही उमेदवारी द्या, तो निवडणून येईल, पण संजय केळकर यांना देऊ नका, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाकडून देण्यात आली. तर भाजपमध्ये देखील संजय केळकर यांच्याविरोधात बंडखोरी होणार असल्याचे संकेत दिसत आहे. 

ठाण्यात भाजपमध्ये बंडखोरी होणार?  - संजय केळकर यांना तिकीट जाहीर झाले असताना भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर आज उमेदवारी अर्ज घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे शहर मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवण्याचा मिलिंद पाटणकर यांचा निर्धार आहे. मिलिंद पाटणकर हे 5 टर्म नगरसेवक होते, तर उपमहापौरपद देखील काही काळ त्यांच्याकडे होते, असे असून पक्षाने दुर्लक्ष केल्याने आज मिलिंद पाटणकर उमेदवारी अर्ज घेणार असून ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची माहीत समोर येत आहे. 

शिवसेना शिंदे गटाकडून मीनाक्षी शिंदे मैदानात?  - याच मतदार संघात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील काल उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच मीनाक्षी शिंदे यांच्या प्रचारार्थ लाडकी बहीण विधानसभा निवडणूक लढवणार, असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर माजी शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर हे देखील निवडणूक लढण्यास याच मतदारसंघातून ठाम आहेत. त्यामुळे संजय केळकर यांना स्वतःचा पक्षातून तसेच मित्र पक्षातून मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

मनसेकडून अविनाश जाधव रिंगणात- ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून अविनाश जाधव यांना तिकीट देण्यात आले आहे. एकूणच संजय केळकर यांना उमेदवारी मिळताच भाजप आणि शिंदे गटाकडून नाराजी नाट्य सुरु असताना अविनाश जाधव काल ठाण्यातील आनंद आश्रमात गेले. अविनाश जाधव यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील स्वागत केले. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं? - 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत लढत भाजप आणि मनसेमध्ये थेट लढत झाली. या निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांनी मनसेचे अविनाश जाधव यांचा 19,424 मतांनी पराभव केला. 2019 विधानसभा निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 3,37,846 होते. निवडणुकीत 1,78,258 लोकांनी मतदान केले. यात भाजपचे संजय केळकर यांना 92,298 मते मिळाली. तर अविनाश जाधव यांना 72,874 मते मिळाली. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट