Breaking News
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा;
सयाजी शिंदे यांची विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड
- सह्याद्री देवराईचे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात योग्य आदर आणि सन्मान राखणार असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. यावेळी अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांची आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे.
सयाजी शिंदे यांनी अनेक सामाजिक कांमांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांना झाडांची आवड आहे. त्यांचे सह्याद्री देवराईचे काम मोठे असल्याचे अजित पवार म्हणाले. आम्ही त्यांच्यासोबत सखोल चर्चा केली आहे. त्यांनी काही गोष्टी चांगल्या मांडल्या असल्याचे अजित पवार म्हणाले. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या सोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे समाधान आहे. त्यांनी एक चांगला निर्यण घेतला आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आनंद असल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा योग्य आदर आणि सन्मान राखणार आहे. यामध्ये कोणताही अडचण येणार नाही असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील कलाकारांनी चांगल काम केलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे अजित पवार म्हणाले.
सयाजी शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता काय मागे हटायच नाही जे व्हायच ते होऊ देत असे मत राष्ट्रावादीत प्रवेश केल्यानंतर सयाजीशिंदे यांनी व्यक्त केले. मी पाचशे सहाशे फिल्म केल्या आहेत. त्यामुळे आता काही अडचण नाही. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करायचं आहे. त्यामुळे प्रवेश करत आहे. पुढच्या पाच वर्षात चांगलं काम करणार आहे, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. आता नव्या भूमिकेत आलो आहे. मला लक्षात आल की सिस्टीममध्ये जाऊन काम कराव लागेल म्हणून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 22 लाख बिया वाटल्या असल्याचे सयाजी शिंदे म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant