पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...
पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. मोहम्मद सिराजने तेलंगणा पोलीस विभागात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदाचा पदभार स्वीकारला. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर तेलंगणा सरकारने सिराजसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली.तेलंगणा सरकारने सिराजला जमिनीसह सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता सिराजने डीएसपीची जबाबदारी स्वीकारली आहे. सिराजने टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. तो टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेचा देखील भाग होता. सिराजच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्याला खूप मोठी रक्कम मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार, तेलंगणा पोलिसांमध्ये डीएसपीची वेतनश्रेणी 58850 रुपये ते 137050 रुपये इतकी आहे.मूळ वेतनासोबतच सिराजला घरभाडे, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता यासह इतर प्रकारचे भत्ते मिळतील. सिराजने वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. पूर्वी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण त्यांनी परिस्थितीशी झुंज दिली आणि आज या पदावर पोहचल्याने सिराजचे कौतुक होत आहे. सिराजने भारतासाठी 78 कसोटी विकेट घेतल्या आहेत. त्याने वनडेत 71 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 14 टी-20 विकेट्सही घेतल्या आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade