Breaking News
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी झाली यशस्वी
नवी मुंबई - :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या सी 295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याला वॉटर सॅल्युटद्वारे मानवंदना देण्यात आली. नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही या धावपट्टीपासून काही अंतरावर उड्डाण करत फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. C295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आलं होते. C-295 या विमानाचे यशस्वी लँडिंग झाल्यामुळे आता लवकरच नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar