NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचा दणदणीत विजय

जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचा दणदणीत विजय

जम्मू- काश्मिरी - जम्मू काश्मिरमध्ये काँग्रेस  आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडी सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणूकीतील  90 जागांपैकी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने 49 जागा पटकावत बहुमत मिळवल आहे.. तर भाजपाला 29 जागांवर समाधान मानावं लागलंय. इतरांना 9 जागा मिळाल्यात. विजयानंतर नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मतदारांचे आभार मानत ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मिरचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 हटवण्याचा निर्णय मान्य नसल्याचं इथल्या जनतेने आपल्या मतदानातून दाखवून दिल्याचं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. पुढच्या पाच वर्षात जम्मू-काश्मिरमध्ये बेरोजगारी, महागाई आणि अंमली पदार्थांचा व्यापार संपवण्यासाठी आम्ही काम करु असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये तब्बल 10 वर्षांनी निवडणूक पार पडली. याआधी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप आणि पीडीपने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. पण 2018 मध्ये भाजप आणि पीडीपी वेगळे झाले. त्यानंतर काही महिन्यांनी केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मिरमधऊन आर्टिकल 370 हटवलं आणि लढाखला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिला. यावेळच्या निवडणुकीत जम्मू-काश्मिरला पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.

जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. फारुख अब्दुल्ला यांनी निकालानंतर जम्मू-काश्मिरच्या लोकांचे आभार मानत ओमर अब्दुल्लांच्या नावाची घोषणा केली. ओमार अब्दुल्ला हे बडगाम आणि गांदरबल या दोन जागांवर निवडणूक लढवत होते, आणि दोन्ही जागांवर त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट