Breaking News
ऑलिम्पिक पदक जिंकून दोन महिने उलटूनही स्वप्नील कुसाळे बक्षीस रक्कमेपासून वंचित
मुंबई - विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भरमसाठ योजनांची घोषणा करणारे महाराष्ट्र राज्य सरकार ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेला बक्षिसाची रक्कम द्यायला विसरले आहे. देशाची मान उंचावणारे पदक जिंकून दोन महिने उलटले तरी अजून स्वप्नीलला बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.
याबाबत त्याच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली.कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत असताना, कुसाळे यांनी ही नाराजी व्यक्त केली. सरकारने जाहीर केलेली बक्षीसाची रक्कम तुटपुंजी आहे. नेमबाजांबाबत सरकार इतकं उदासीन आहे असं ही ते म्हणाले. शिवाय असं माहीत असतं तर स्वप्नीलला नेमबाजीत पाठवलंच नसतं, अशा भावनाही स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.
खेळातील दर्जा आणि सातत्य कायम ठेवायचं असेल आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवायचं असेल, तर स्वप्नीलला उच्च दर्जाच्या सरावाची गरज आहे असे ही ते म्हणाले. त्यामुळे त्याच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या बक्षिसाठी रक्कम 5 कोटी करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.
महाराष्ट्रातल्या खेळाडून हे पदक मिळवणं गौरवाचं होतं. त्यामुळे स्वप्नीलच्या पाठीवर कौतूकाची थाप टाकण्यात आली. राज्य सरकारनेही त्याला एक कोटीचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र दोन महिने उलटले तरीही ते बक्षिस अजूनही स्वप्नील कुसाळेला मिळालेले नाही. याबाबत त्याच्या वडीलांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलेला नेमबाज स्वप्नील कुसाळे याची राज्य सरकारनं चेष्टा केल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant