आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय फायटरने पाकच्या फायटरचा केला पराभव
आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय फायटरने पाकच्या फायटरचा केला पराभव
नवी दिल्ली - भारतीय मिक्सड आर्शल आर्ट (MMA) संग्राम सिंहने पाकिस्तानी फायटरला धोबीपछाड देत नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमधील 93 किलो वजनी गटात संग्राम सिंहने शानदार विजय मिळवला. जॉर्जिया येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये संग्रामने पाकिस्तानचा फायटर अली रजा नसीर याचा पराभव करत तिरंगा उंचावला. संग्रामने अवघ्या 1 मिनिट 30 सेकंदात रजा नसीरला पराभूत केले. या विजयानंतर संग्राम सिंहने ट्विटरवरुन सर्वांचे आभार मानले आहेत, तसेच भारत (India) सरकारकडून अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.
एमएमए फायटींग स्पर्धेत जिंकणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय फायटींग स्पर्धेतील 93 किलो वजनी गटात भारतीय फायटरद्वारे सर्वात कमी वेळेत विजय मिळवण्याचा विक्रमही संग्राम सिंहच्या नावावर जमा झाला आहे. संग्राम सिंहच्या या विश्वविजयानंतर जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भारतीय चाहत्यांकडूनही त्यांचे कौतूक करण्यात येत आहे. चाहत्यांकडून होत असलेल्या अभिनंदनाच्या वर्षावावर संग्रामने आभारपूर्वक पोस्ट लिहिली आहे. संग्रामने ट्विटरवरुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
सग्रामने लिहिले आहे की, मी भारतासाठी हा सामना जिंकू शकलो, याचा मला अभिमान वाटतो. माझ्या या विजयात माझे कोच भुपेश कुमार यांचं अमूल्य योगदान आहे, मी त्यांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. तसेच, माझे आंतरराष्ट्रीय कोच डेविड सर यांनीही मला फुल्ल सपोर्ट केला. जर हे दोन कोच नसते, तर माझी तयारी चांगली झाली नसती, असे म्हणत आपल्या कोचप्रतीही संग्राम सिंहने आदर व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे