Breaking News
भारत- बांगलादेश Test Match मध्ये आर.अश्विनचा विश्वविक्रम
चेन्नई - भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) इतिहास घडवला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी आर. अश्विननं होमग्राऊंडवर शतक झळकावलं.टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्स आणि 20 वेळा 50 रनचा टप्पा ओलांडणारा अश्विन हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. जगातील कोणत्याही ऑल राऊंडरला ही कामगिरी यापूर्वी करता आलेली नाही. अश्विनच्या शतकाच्या जोरावरच भारताला ३०० धावांचा पल्ला गाठता आला. अश्विनने यावेळी नाबाद १०२ धावांची खेळी साकारली, तर जडेजाने नाबाद ८६ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताला पहिल्या दिवस अखेर६ बाद ३३९ अशी मजल मारता आली.
रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला. अश्विननं होम ग्राऊंडवर शतक झळकावलं.तर, रवींद्र जडेजानं 86 धावा केल्या. अश्विन आणि जडेजानं 195 धावांची भागिदारी केली. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रवींद्र जडेजा पहिल्यांदा कसोटी सामन्याच्या निमित्तानं मैदानात उतरला होता. आज त्यानं 86 धावांची खेळी करत भारताला अडचणीतून बाहेर काढलं.
भारताचे दिग्गज फलंदाज आज दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि केएल राहुल मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. बांगलादेशच्या हसन महमूदनं भारताला चार धक्के दिले. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंतला त्यानं बाद केलं. रिषभनं चांगली सुरुवात केली होती मात्र तो 39 धावांवर बाद झाला.
भारताचा सलामीवर यशस्वी जयस्वाल ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी दमदार कामगिरी करत आहे. यशस्वी जयस्वालनं अर्धशतकी खेळी केली. त्यानं 56 धावा केल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर