Breaking News
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनीया यांनी केला कॉग्रेसमध्ये प्रवेश
हिसार - कुस्तीचा आखाडा गाजवणारे विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आता काँग्रेसशी हात मिळवणी करत राजकीय आखाड्यात उतरले आहे. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस जोरदार तयारी सुरु आहे. आम आदमी पक्षाशी आघाडीची चर्चा केल्यानंतर आता ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोघांना उमेदवारी दिली जाणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. दोन्ही कुस्तीपटू जाट समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांचे २०० दिवसांहून अधिक काळ शंभू बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. यामध्ये जाट समुदायाच्या शेतकऱ्यांचा मोठा भरणा आहे. तसेच हरियाणामध्येही जाट समुदायाचा मोठा प्रभाव आहे. या अनुषंगाने हरियाणा विधानसभेत काँग्रेसला कसा लाभ होणार याचा घेतलेला आढावा.
फोगट आणि पुनिया यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे जाट समुदायाच्या पाठिंब्यासह महिला, क्रीडापटू आणि युवकांचा काँग्रेसला पाठिंबा मिळू शकतो. हरियाणाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बाबरीया यांनी नुकतेच सांगितले होते की, विनेश फोगटची उमेदवारी लवकरच जाहिर केली जाईल. काँग्रेसकडून जुलना आणि बदली या दोन मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. दोन्ही मतदारसंघात जाट समुदायाचे प्राबल्य आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant