लॉर्ड्स मैदानावर होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, वेळापत्रक जाहीर
लॉर्ड्स मैदानावर होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, वेळापत्रक जाहीर
लंडन - ICCने आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ (WTC Final 2025 Final) चा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळवला जाणार आहे याबाबत घोषणा केली.WTC च्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल. हा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०२५ चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
WTC 2025 चा अंतिम सामना ११ जून ते १५ जून २०२५ या कालावधीत हा खेळवला जाईल. १६ तारीख हा राखीव दिवस असेल. लॉर्ड्सवर पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होणार आहे. यापूर्वी, २०२१ चा अंतिम सामना द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे खेळला गेला होता आणि २०२३ चा अंतिम सामना ओव्हल, लंडन येथे खेळला गेला होता, जो अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२०२५ ची सायकल पूर्ण झाल्यावर गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये हा सामना खेळला जाईल. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून सध्याचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. तथापि, इतर संघांना अद्याप संधी आहे. न्यूझीलंड (तिसरा), बांगलादेश (चौथा) इंग्लंड (पाचवा), श्रीलंका (सहावा), दक्षिण आफ्रिका (सातवा) आणि पाकिस्तान (आठवा) अजूनही अंतिम फेरीतील निर्णायक स्थानासाठी शर्यतीत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade