Breaking News
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखराने भारताला दिलं पहिलं गोल्ड मेडल
पॅरिस - पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धा सध्या सुरू आहे. शुक्रवारी (30 ऑगस्ट) भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालने कांस्य पदक जिंकलं. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या दुसऱ्या दिवशी भारताने एकाच स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली आहे. अवनी लेखरा हिने पात्रता फेरीत चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अवनीने पात्रता फेरीत ६२५.८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. तिचा स्कोअर पॅरालिम्पिक विक्रमापेक्षा फक्त ०.२ गुण कमी होता. तर मोना पाचव्या स्थानावर होती. अवनी लेखराने २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. यादरम्यान तिने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २४९.६ गुण मिळवले होते.
भारताने आज एकाच दिवशी चार पदकाचीही कमाई केली आहे. आज प्रथम भारताने नेमबाजीत दोन पदकं जिंकली होती. यामध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाचा समावेश होता. त्यानंतर भारताने १०० मीटर शर्यतीत अजून एक कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भारताच्या मनीष नरवाले आता १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात आता रौप्यपदक पटकावले आहे.
भारताला यावेळी दुसरे पदक जिंकवून दिले ते मोना अगरवालने. मोनाने यावेळी १० मीटर एअ़़र रायफल प्रकारातच हे पदक जिंकले. मोना या स्पर्धेत तिसरी आली आणि तिने हे कांस्यपदक पटकावले. भारताला यावेळी तिसरे पदक जिंकवून दिले ते प्रीती पालने. प्रीतीने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला कांस्पदक जिंकवून दिले. त्यानंतर आता मनीष नरवालने भारताला हे चौथे पदक जिंकवून दिले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade