NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तुर्कस्तानच्या संसदेत अर्धातास तुफान हाणामारी

तुर्कस्तानच्या संसदेत अर्धातास तुफान हाणामारी

अंकारा - आपल्या देशात संसदीय कामकाजाच्या दरम्यान लोकप्रतिनिधींचा आरडाओरडा, गदारोळ हा आपण प्रत्येक अधिवेशन सत्रात पाहत असतो. मात्र संसदीय नियमावलीचा आदर राखून एकमेकांवर केवळ शाब्दीक हल्ला चढवला जातो. कितीही मतभेद झाले तरी हात उचलला जात नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये देखील संसदीय कामकाजा दरम्यान खडाजंगी होत असते. तुर्कस्तान मधून नुकत्यास समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सुमारे अर्धातास तुफान हाणामारी झाल्याचे दिसत आहे.

काल (दि, १७) तुर्कस्तानच्या संसदेत जोरदार हाणामारी झाली. खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्या मारल्या. ही हाणामारी सुमारे 30 मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले. व्हिडिओ फुटेजमध्ये स्पीकरच्या व्यासपीठाच्या पायऱ्यांवर रक्तही दिसले. खरे तर एका विरोधी खासदाराने तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांच्या पक्षाला दहशतवादी संघटना म्हटले आहे. यावर एर्दोगन यांच्या एकेपी पक्षाच्या एका नेत्याने विरोधी पक्षनेते अहमद सिक यांच्यावर हल्ला चढवला. हाणामारी वाढली आणि खासदारांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्य विरोधी पक्ष सीएचपीचे प्रमुख ओझगुर ओझेल यांनी हिंसाचाराचा निषेध केला. संसदेत हे सर्व घडताना पाहून लाज वाटते, असे ते म्हणाले.

तुर्कस्तानच्या संसदेत शुक्रवारी विशेष सत्राची बैठक सुरु होती. यामध्ये एक खासदार काईन आटलेविषयी चर्चा सुरू होती. अटाले यांनी 2013 मध्ये एर्दोगान सरकारच्या विरोधात निदर्शने केली, ज्यामध्ये खूप हिंसाचार झाला होता. यानंतर आटले यांना अटक करण्यात आली. आटले 2013 पासून तुरुंगात आहेत. त्यांना 2022 मध्ये 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत आटले यांनी बाजी मारली होती. डाव्या टीआयपी पक्षातून ते खासदार झाले. संसदेत तीन जागा आहेत. यानंतर एर्दोगन यांच्या पक्षाने अटाले यांचे संसदेचे सदस्यत्व नाकारणारे विधेयक आणले. या निर्णयाला न्यायालयात अपील करण्यात आले. 1 ऑगस्ट रोजी तुर्कीच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला ज्यामध्ये संसदेचा निर्णय रद्द करण्यात आला. आटाळे पुन्हा खासदार झाले. न्यायालयाने त्यांचे खासदार म्हणून सर्व अधिकार बहाल केले.

अटले यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. वास्तविक, तुरुंगात असल्याने त्यांना आपल्या भागातील कामे करता येत नसल्याची याचिका आटले यांनी न्यायालयात केली होती. त्यांना ५ वर्षे तुरुंगात राहण्यापासून सूट देण्यात यावी. मुदत संपल्यानंतर ते पुन्हा तुरुंगात जाणार आहे. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली. न्यायालयाच्या या निर्णयावर संसदेत चर्चा सुरू होती. अटाले यांच्याच पक्षाचे नेते अहमद सिक भाषण देत होते. ते म्हणाले, “सत्ताधारी पक्षाचे अनेक खासदार अटाले यांना दहशतवादी म्हणतात याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. खर तर तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुम्ही दहशतवादी म्हणता पण सर्वात मोठे आतंकवादी तुम्ही इथे खासदार म्हणून बसलेले आहात. तुमचा पक्ष दहशतवाद्यांचा पक्ष आहे.

त्यांच्या या विधानावरून संसदेत गदारोळ सुरू झाला. गोंधळामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले. तीन तासांहून अधिक विश्रांतीनंतर सत्र पुन्हा सुरू झाले. एर्दोगान यांच्या पक्षाविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल स्पीकरने विरोधी पक्षाचे नेते सिक यांना फटकारले. सिक यांच्यावर हल्ला करणाऱ्या नेत्यांनाही वक्त्याने खडसावले. भांडणात सहभागी असलेल्या दोन्ही खासदारांवर बंदी घालण्यास सांगितले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट