NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन

ठाणे - जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने (१९ ऑगस्ट) ’ठाणे महानगरपालिका’ आणि ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने’,ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन उद्यापासून सुरू झाले असून सदर प्रदर्शन 20 ऑगस्ट 2024 पर्यत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेतील विजेते ठरलेल्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश देखील या प्रदर्शनात करण्यात आला असून ठाणेकर नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

तीन हात नाका येथील हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भरविण्यात आले असून 20 ऑगस्टपर्यत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सदरचे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांमध्ये सदरची स्पर्धा घेण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ‘Wild Life’ या विषयात प्रथम पारितोषिक हिरा पंजाबी, द्वितीय संदीप यादव, तृतीय लाझरस पॉल यांनी तर उ्ततेजनार्थ पारितोषिक हिरा पंजाबी आणि बिजू बोरो यांना प्राप्त झाले आहे.

‘Performing Art’, या विषयामध्ये प्रथम पारितोषिक गणेश नामदेव मेमाने, द्वितीय मनोज गोविंद मुसळे, तृतीय संजय बप्हाटे यांनी पटकाविला असून उत्तेजनार्थ क्रमांक शंतनु बोसे, अरुल डॅनम होरिझन यांना मिळाले.

‘Festival’, या विषयामध्ये प्रथम राकेश रावळ, द्वितीय शरद पाटील, तृतीय आकाश येवगे यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक श्रवण तांडलिया आणि शंतनु दास यांनी पटकाविले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 50,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.25,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- चौथे आणि पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘News Photo’ या विषयामध्ये प्रथम पारितोषिक सतेज शरद शिंदे, द्वितीय अरुल होरिझन, तृतीय अंशुमन पोयरेकर यांनी प्राप्त झाले असून उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक जोशी आणि के.के. चौधरी यांनी पटकाविले. ‘Photo Features (story) या विषयात प्रथम पारितोषिक अमित चक्रवर्ती, द्वितीय नागोंडा पाटील, तृतीय सतीश विष्णु काळे यांनी पटकाविले आहे. ‘Wedding’, या विषयात प्रथम पारितोषिक धनराज उदयकांत कडलक, द्वितीय अश्पकाली किल्लेकर, तृतीय शादाब खान यांनी पटकाविला असून उत्तेजनार्थ पारितोषिक सौरभ नाझरे, अनिकेत गुरव यांना प्राप्त झाले आहे. राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 25,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.20,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- चौथे आणि पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात येणारआहे.

जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘Monsoon या विषयात प्रथम पारितोषिक राकेश रावळ, द्वितीय के.के. चौधरी, तृतीय निलेश पाष्टे यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक जोशी, के.के. चौधरी यांना प्राप्त झाले आहे. ‘Thane News 24’ या विषयात प्रथम पारितोषिक सचिन देशमाने, द्वितीय प्रफुल्ल गांगुर्डे यांनी पटकाविले आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेतील दोन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु. 20,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- तर चौथे आणि पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु. 3,000/- देण्यात येणार आहे.

तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी ‘Reflection’ हा विषय ठेवण्यात आला होता, मोबाईलच्या माध्यमातून सदरची छायाचित्रे पाठविण्यात आली होती. यामध्ये प्रथम पारितोषिक महेश आंब्रे, द्वितीय सई चासकर तृतीय शिवाजी धुते यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक कौशिक आणि पियूष पाष्टे यांनी पटकाविले आहे. तर ‘Daily Life’ या विषयात प्रथम पारितोषिक शादाब खान, द्वितीय शंतनु बोस, तृतीय कुणाल गव्हाने यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक हिमांशु मेस्त्री आणि निखिल पांचाल यांनी पटकाविले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु.20,000/- द्वितीय क्रमांसाठी प्रत्येकी रु. 15,000/-तृतीय क्रमाकांसाठी रु. 10,000/- तर चौथे आणि पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकासह, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट