Breaking News
टिम इंडियाच्या Bowling Coach पदी या विख्यात गोलंदाजाची नियुक्ती
मुंबई - श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरची हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आली होती. अशातच आता टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजीमध्ये सुधारणा होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. मॉर्ने मॉर्कल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो.
साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्कलची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याची माहिती दिली. बांगलादेश सिरीजपासून मॉर्ने मॉर्कल टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात टेस्ट मालिका खेळवली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळवला जाईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे