ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला सासऱ्यांकडून म्हैस भेट
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला सासऱ्यांकडून म्हैस भेट
इस्लामाबाद - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये पाकीस्तानला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अर्शद नदीमवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशाची मान उंचावणाऱ्या या युवा खेळाडूने सर्वसाधारण परिस्थितीत मोठ्या कष्टाने हे यश संपादन केले आहे. पाकीस्तान सरकार आणि तेथील विविध प्रांतीय सरकारांकडून अर्शदला मोठ्या रक्कमांचे बक्षिस जाहीर करण्यात येत आहे. या साऱ्यात अनोखी बाब म्हणजे अर्शदला त्यांच्या सासऱ्यांनी या भेट म्हणून चक्क एक म्हैस दिली आहे. अर्शद नदीम पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्याचे सासरे मोहम्मद नवाज यांनी त्याला एक म्हैस भेट दिली. अशी भेट देताना नवाज म्हणाले की, पाकिस्तानच्या ग्रामीण भागात म्हशीला खूप मौल्यवान मानले जाते आणि खेडेगावात हा आदर दाखवण्याचा एक मार्ग आहे.
पाकिस्तानच्या या भालाफेक स्टारवर सध्या सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडत आहे. त्याला पहिले पारितोषिक जागतिक ॲथलेटिक्सकडून मिळणार आहे, ज्यात अर्शद नदीमला बक्षीस रक्कम म्हणून ५० हजार डॉलर्स दिले जातील. भारतीय चलनात ५० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ४२ लाख रुपये होतात.
सोबतच अर्शदला पाकिस्तान सरकारकडूनही भरपूर पैसे मिळणार आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने नदीमला १० कोटी पाकिस्तानी रुपये देण्याचे आधीच आश्वासन दिले आहे. याशिवाय पंजाबचे राज्यपाल सरदार सलीम हैदर खान हे अर्शदला २० लाख पाकिस्तानी रुपये देणार आहेत.
यानंतर सिंध प्रांताचे मुख्यमंत्री आणि कराचीचे महापौर मिळून अर्शदला ५ कोटी पाकिस्तानी रुपये आणि सिंधचे राज्यपाल कामरान टेसोरी स्वतंत्रपणे १० लाख रुपये देणार आहेत. प्रसिद्ध पाकिस्तानी संगीतकार अली जफर देखील नदीमला १० लाख रुपये भेट देणार आहे. ही रक्कम एकत्रितपणे पाकिस्तानी चलनात अंदाजे १५.४ कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ४.५ कोटी रुपयांदरम्यान आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade