अर्पित पांडेने मंगला अडसूळ स्मृती खुली बुध्दिबळ स्पर्धा जिंकली
अर्पित पांडेने मंगला अडसूळ स्मृती खुली बुध्दिबळ स्पर्धा जिंकली
मुंबई - आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त आयोजित स्व. मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक खुली जलद बुध्दिबळ स्पर्धा फिडे गुणांकित बुध्दिबळपटू अर्पित पांडेने जिंकली. सातव्या साखळी फेरीपर्यंत सर्व सामने जिंकणाऱ्या अर्पितने निर्णायक आठव्या फेरीमध्ये सावध खेळ करीत रचित गुरनानी विरूद्ध २८ व्या मिनिटाला बरोबरी साधली आणि सर्वाधिक ७.५ साखळी गुणांसह अजिंक्यपदाला गवसणी घातली. विजेत्या अर्पित पांडेला रुपये दहा हजार पुरस्कारासह विजेतेपदाचा स्व. मंगला अडसूळ स्मृती चषक देऊन माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांनी गौरविले. यावेळी को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियनचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल व खजिनदार प्रमोद पार्टे, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुध्दिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेमध्ये रुपये सहा हजारसह द्वितीय पुरस्कार फिडे गुणांकित बुध्दिबळपटू रचित गुरनानीने (६.५ गुण) पटकाविला. १५ वर्षीय अरेना कॅन्डीडेट मास्टर अरविंद अय्यरने (६.५ गुण) तृतीय, फिडे मास्टर मिथिल आजगावकरने (६.५ गुण) चौथा, १८ वर्षीय फिडे मास्टर अनिरुद्ध पोतवाडने (६ गुण) पाचवा, अनिकेत बापटने (६ गुण) सहावा, वंश अग्रवालने (६ गुण) सातवा, जीत शाहने (६ गुण) आठवा, गुरुप्रसाद कुळकर्णीने (६ गुण) नववा, सोहम पवारने (६ गुण) दहावा, योहान बोरीचाने (६ गुण) अकरावा तर फिडे मास्टर वेदांत नगरकट्टेने (५,५ गुण) बारावा पुरस्कार मिळविला. स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सातारा आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ५१ बुध्दिबळपटूसह १०४ खेळाडूंनी चुरशीच्या लढती दिल्या. को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियन-मुंबईतर्फे एकूण रु. ४१,००० /- आणि आकर्षक ७५ चषकांचा पुरस्कार शालेय व खुल्या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना देण्यात आला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade