मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हवामान बदलाचे संभाव्य धोके

हवामान बदलाचे संभाव्य धोके

सध्या जगाला हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर जुने-सुप्त व्हायरस पुन्हा परतण्याचा युरोपला धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे व्हायरस, साथीचे रोग गंभीर बनत चालले आहेत. कोरोनाने जगावर मोठे संकट आणले आहे. यामुळे आजवर लाखो  लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. जंगलावर मानवी अतिक्रमणामुळे हे सारे घडत आहे, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. परिणामी कोरोनासारखीच अन्य मोठी संकटे भवितव्यात ओढवणार आहेत. जगाच्या तापमानात १ डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. यामुळे ही तापमान वाढ मलेरियास डेग्यू सारख्या रोगांची वाहक बनली आहे. देवी, शीतज्वरासारखे उत्पात माजविलेले व्हायरस पुन्हा परतण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. एकूण जागतिक तापमान वाढ रोखण्याचे आव्हान जगासमोर आहे.               

            स्वीडनच्या उमीया विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजीच्या संशोधक बिर्गिट्टा इव्हनगार्ड यांनी म्हटले आहे की, मानवाने त्याची हद्द पार केली आहे. आपणच आपले शत्रू बनत आहोत. हवामान बदलाचा हा टाईम बॉम्ब रशिया, कॅनडा आणि अलास्काच्या भागात पसरू लागला आहे. कारण जगात जेव्हा औद्योगिकीकरणाचा उगम झाला तेव्हापासून या भागात तिप्पट कार्बन उत्सर्जन झाले आहे. जर मनुष्यवस्तीने २०१५ च्या पॅरिस करारानुसार तापमान दोन डिग्री सेल्सिअसने कमी केले तर हा ध्रुव प्रदेशातील उघडी पडलेली जमीन २१०० पर्यंत पुन्हा बर्फाच्छादीत होईल असे युएनच्या हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान बदलाचे दृश्य परिणाम जगातील काही ठिकाणी स्पष्टपणे दिसून आले आहेत. जिथे वाळवंट आणि सदोदित तापमान सुमारे ५५ अंश सेल्सियसवर असते, अशा ठिकाणी म्हणजे अल्जेरियाच्या सहारा वाळवंट येथे काही वर्षांपूर्वी बर्फ पडले होते. येथे फेब्रुवारी १९७९ मध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव पडला होता. जगाच्या थंड वातावरणात हिमवर्षाव होणे हे सामान्य आहे,  परंतु जगाच्या अतिशय गरम भागात बर्फवृष्टी होणे हा साधासुधा योग नाही, वर्षानुवर्षे घडणाऱ्या हवामान बदलाचा एक भाग आहे. हवामान बदलाच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी जगातील प्रमुख देशांनी एकत्र येवून ठोस कार्यक्रम आखला पाहिजे, असे वाटते. पृथ्वीवर कार्बनचे उत्सर्जन रोखणे व नंतर ते खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. २०२५ पर्यंत पृथ्वीवरील विकसित देशांनी १९९० च्या कार्बन उत्सर्जनाच्या पातळीमध्ये ४० टक्के कपात करणे आवश्यक आहे. विकसित देशांनी औदयोगिक राष्ट्रांच्या सहकार्याने हे प्रमाण कमी केले पाहिजे. उष्णकटिबंधीय जंगलांना विशिष्ट निधी, तंत्रासह संरक्षित करणे म्हणजेच हवामानासाठी वन ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणे. दूषित जीवाश्म इंधन निर्मिती केलेल्या उर्जेंऐवजी नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जेची कार्यक्षमता वाढवणे हे त्यावर उपाय आहेत. अणुऊर्जासारख्या उपाययोजना नाकारणे आता काळाची गरज बनणार आहे.                                                     

           जर उपाययोजना वेळेत सोडवली गेली नाही तर आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण होवून मानव जातीसह सजीव धोक्यात येणार आहेत. केवळ विकसनशील किंवा विकसनशील देश नव्हे, तर जगातील संपूर्ण देशांची ही जबाबदारी आहे. डब्लू-डब्लूएफच्या अभ्यासानुसार,  पुढच्या ५० वर्षांत हे जग हवामान बदलाच्या प्रक्रियेत नष्ट होईल. हा पर्यावरणाशी संबंधित शास्त्रज्ञानी दिलेला इशारा आहे. पृथ्वीवरील खनिज, पाणी,वृक्ष संसाधनाची ज्या गतीची मानवाकडून लूट केली जात आहे, ती पस्तीस वर्षांच्या आत जगाच्या लोकसंख्येची गरज पुरवण्यासाठी, पृथ्वीसारख्या किमान दोन ग्रहांवर कब्जा करण्याची आवश्यकता पडेल. जागतिक वन्यजीव निधीच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ), पर्यावरणाशी संबंधित संघटनेच्या ताज्या अहवालात, पर्यावरण बिघडण्यासाठी जगातील सर्वात दोषी अमेरिका असल्याचे म्हटले आहे.                               

         डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालात शास्त्रज्ञ इशारा देतात - मानवाला चंगळवादी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. वर्ष २०५० पर्यंत ही पृथ्वी आपल्यासाठी निरुपयोगी ठरेल. शास्त्रज्ञ म्हणतात की, १९७० मध्ये सुमारे अडीच लाख टन केड माशांचे उत्पादन झाले, जे १९९५ मध्ये ६० हजार टन एवढे कमी झाले. १९७० ते २००२ च्या दरम्यान, पृथ्वीवरील जंगलाची टक्केवारी १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. ताजा पाणी साठा ५५ टक्के कमी झाला आहे आणि सागरी जीवन एक तृतीयांश राहिले आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालानुसार, हे धोके मानवालाच नव्हे तर सस्तन प्राणी, पक्षी, मासे इ. ना देखील आहेत. गेल्या ३० वर्षांत या प्रजातींची संख्या निम्म्याहून कमी झाली. या अहवालात, सरासरी अमेरिकी नागरिक इतर देशांच्या तुलनेत अनेक पट कार्बन उत्सर्जन करतात आणि अनेक आशियाई व आफ्रिकन नागरिकांच्या तुलनेत वाहने वापरून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन करतात. पाणी, हवामानाचे नियमन, ऑक्सिजन, ऊर्जा प्रवाह, अन्नसाखळी इत्यादि १५ नैसर्गिक सेवा आम्हाला निसर्गाच्या देणग्यांपासून मिळाल्या आहेत. पृथ्वीवरील तापमान वाढत आहे, जंगलांमधील झपाटयाने कमी होत चाललेली लोकसंख्या, जैविक वैविध्याचे जतन केलेल्या प्रवाळ प्रांतापैकी ४० टक्के संकुचित होणे असे प्रकार घडत आहेत. १९६० पासून नद्या आणि तलावाच्या पाण्यात दोन वेळा वाढ झाली. जीवसृष्टीची प्रजाती नैसर्गिक दरांपेक्षा हजारपेक्षा जास्त वेगाने वेगाने वाढत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरणाचा विकास आणि कोळसा आणि पेट्रोलियमचा जास्त वापर थांबवणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढ, बेसुमार पाणीवापर,  जंगलांचा ऱ्हास, वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे. वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्र पडले असून सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे पृथ्वीवर थेट पडत आहेत. त्यामुळे जमीन तापत आहे, हवा गरम होत असून तापमान वाढ होत आहे. हवामानातील बदलांचा सर्वात मोठा परिणाम गरीब देशांवर होऊ शकतो. हवामान बदलाचा धोका लक्षात घेवून प्रत्येक देशाने, नागरिकाने हवामान बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळणे हितावह वाटते.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट