हे भारतीय पुरुष आणि महिला खेळाडू ICC ‘प्लेयर ऑफ दी मंथ’ ने सन्मानित
हे भारतीय पुरुष आणि महिला खेळाडू ICC ‘प्लेयर ऑफ दी मंथ’ ने सन्मानित
देश विदेश J
मुंबई - ICC ने आज Player of the Month जाहीर केले आहेत. महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंपैकी दोघांची प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार विजेते म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी मेन्स क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, स्मृती मानधनाला प्लेअर ऑफ द मंथ वुमन्स क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आलं आहे.
जसप्रीत बुमराहनं T 20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. जसप्रीत बुमरहानं टी 20 वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देखील पटकावला. याशिवाय बुमरहाला आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केला आहे. या शर्यतीत भारताचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाझ होता.
जसप्रीत बुमरहानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. बुमरहानं आयरलँड विरुद्ध 3, पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट घेतल्या. इंग्लंड विरुद्ध जसप्रीत बुमरहानं 2 विकेट घेतल्या. याशिवाय दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या फायनलमध्ये देखील बुमराहनं 18 धावा देत 2 विकेट घेतल्या.
टीम इंडियाच्या महिला संघाची खेळाडू स्मृती मानधना हिचा देखील ICC कडून गौरव करण्यात आला आहे. स्मृती मानधना हिनं दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीमुळं आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार दिला आहे. स्मृती मानधना हिनं हा पुरस्कार तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदा मिळवला आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत इंग्लंड आणि श्रीलंकेच्या खेळाडू होत्या. स्मृती मानधना हिनं दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तीन पैकी दोन सामन्यांमध्ये शतक झळकावलं. तिसऱ्या मॅचमध्ये तिनं 90 धावा केल्या, तर, कसोटीमध्ये देखील स्मृतीने शतक झळकावल आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे