पाकिटबंद खाद्यपदार्थांवर आता दिसेल साखर आणि फॅट्सचं प्रमाण
पाकिटबंद खाद्यपदार्थांवर आता दिसेल साखर आणि फॅट्सचं प्रमाण
मुंबई - पाकिटबंद खाद्यपदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यविषयक विविध तक्रारी जाणवत असल्याच्या अनेक घटना जगभरात समोर येत आहेत. जगभरातील आहारतज्ज्ञ अतिरिक्त वजनवाढ आणि लाईफस्टाईल संबंधित रक्तदाब. मधुमेह अशा आजारांसाठी पाकीटबंद पदार्थ जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून देत आहेत. मात्र हे पदार्थ साखर ,मैदा, तेल, तूप यांनी युक्त असे हे पाकीटबंद पदार्थ चटकदार असल्याने वारंवार खावेसे वाटतात. मात्र हे खाताना ग्राहकांना अलर्च मिळावा म्हणून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या (Packaged Food) लेबलवर एकूण साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटबाबत यांची माहिती देणं अनिवार्य करण्याची तयारी करत आहे. कंपन्यांना संबंधित माहिती मोठ्या आणि ठळक अक्षरांत पाकिटांवर लिहावी लागणार आहे. नियामकाने शनिवारी या संदर्भातील लेबलिंग नियमांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली.
FSSAI चे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांच्य अध्यक्षतेखाली आयोजित अन्न प्राधिकरणाच्या 44 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) विनियम, 2020 मध्ये पोषण माहिती लेबलिंग संदर्भात सुधारणा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांना उत्पादनाचे पौष्टिक मूल्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि चांगले निर्णय घेण्यास सक्षम करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्धेश आहे.
सूचना आणि हरकती मागवण्याच्या उद्देशाने या दुरुस्तीशी संबंधित मसुदा अधिसूचना आता सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवली जाईल. एकूण साखर, एकूण सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियम सामग्रीची माहिती टक्केवारीत दिली जाईल आणि ती ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिली जाईल.
FSSAI नेहमीच ग्राहकांना फसवल्या आणि भ्रम निर्माण करणाऱ्या दाव्यांमध्ये न अडकण्याचा सल्ला देत असतं. यामध्ये ‘हेल्थ ड्रिंक’ शब्द हटवण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईटला पाठवण्यात आलेल्या सल्ल्याचाही समावेश आहे.
सर्व फूड बिझनेस ऑपरेटर (FBOs) यांना ‘100% फळांचा रस’, गव्हाचे पीठ/परिष्कृत गव्हाचे पीठ, खाद्य वनस्पती तेल इत्यादी शब्दांचा वापर आणि फळांच्या रसांच्या जाहिरातींशी संबंधित कोणतेही दावे करण्यास मनाई आहे, तसंच पोषक तत्वांशी संबंधित दावे काढून टाकणे अनिवार्य करण्यास सांगण्यात आलं आहे. दिशाभूल करणारे दावे टाळण्यासाठी या सूचना आणि सल्ले FBOs द्वारे जारी केल्या आहेत.
बाजारात असे अनेक प्रोडक्ट्स आहेत, ज्यांचं पॅकेजिंग पाहता ते हेल्थी असल्याचं समजत निवड केली जाते. पण त्यामध्ये असे अनेक इंग्रेडिएंट्स असतात जे तुमच्या आरोग्याला धोका पोहोचवून शकतात. पण हे सर्व प्रोडक्ट्स हेल्दी असल्याचे दावे करत मार्केटिंग करतात. त्यामुळेच जेव्हा कधी तुम्ही पाकिटंबद खाद्यपदार्थ खरेदी करता तेव्हा त्याचा लेबल नक्की तपासा.
पाकिटंबद खाद्यपदार्थ जास्त काळासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात केमिकलचा वापर केला जातो, जो आपल्या शरिरासाठी धोकादायक असतो. अनेक पाकिटबंद खाद्यपदार्थात सोडिअमचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे ते खरेदी करताना न्यूट्रिशिअस फॅक्ट्स नक्की तपासा. ज्या डबांबद खाद्यपदार्थात फ्रक्टोज कॉर्न सिरप आणि मीठ असतं असे खाद्यपदार्थ खरेदी करू नका किंवा त्यांचा वापर करू नका. ताजे नसल्यामुळे अशा खाद्यपदार्थांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते आणि त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Irfan Pathan
- जन्मदिन
- October 27
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे