पुरस्कार चैतन्यमय उद्योमशीलतेचा...
चैतन्य* या अस्सल मालवणी भोजनाचा आस्वाद देणाऱ्या दादर मुंबई येथील भोजनगृहाच्या सर्वेसर्वा सुरेखा वाळके यांचा तीन हजाराहून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत माटुंगा येथील षणमुखानंद सभागृहात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते कर्तबगार महिला म्हणून महाराष्ट्रीयन उद्योजक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सुरेखा वाळके यांच्या या भोजनगृहात अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक,राजकारणी यांची वर्दळ असते कारण येथल्या पदार्थांना असलेला स्वादिष्ट तडका!आणि अर्थातच त्यांची सौजन्यशील सेवा...
वाळके यांनी व्यवस्थापन कौशल्य वापरून अनेक सुधारणा करून ह्या व्यवसायाला नावारूपाला आणले आहे .
*चैतन्य* मध्ये रुचकर भोजनाचा सहकुटुंब मित्रमंडळींसह आस्वाद घेणे हा स्टेटस सिम्बॉल ठरत आहे.
मी उद्योजक होणारच! या मराठी उद्योजकांना व्यासपीठ देऊन प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेच्या वतीने तीन हजाराहून अधिक उद्योजकांना प्रथमच एका व्यासपीठावर आणून मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत भव्य दिव्य असा शाही सोहळा संपन्न झाला.
यावेळी पुरस्कार विजेत्या सुरेखा वाळके यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant