पुन्हा एकदा घुमणार कब्बडीचा आवाज
आज पासून प्रो कब्बडी लीगचा प्रारंभ होणार आहे, एकूणच दोन वर्षांनी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये यंदा 12 संघ खेळणार अजून यासंघामध्ये तब्बल 66 सामने रंगणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे प्रो कबड्डी लीग पुढे ढकलण्यात आली होती. आणि आता मातीच्या या रांगड्या खेळाला नव्यने सुरवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्सने प्रथमच प्रो कब्बडी लीग सुरु केली आणि क्रिकेट प्रमाणेच या खेळाला सुद्धा समस्त क्रीडाप्रेमींनी भरघोस प्रेम दिले.
प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील पहिला सामना बंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ बंगळुरुमध्येच सामने खेळवले जाणार आहेत. कोरोना नियमांतर्गत या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. आठव्या हंगामाच्या पहिल्या दिवशी एकूण ४ तर दर शनिवारी ३ सामने खेळवण्यात येणार आहे. एकूणच २ वर्षानंतर प्रो कब्बडी लीगचा प्रारंभ होत आहे. आणि यावेळी एकमेकांना भिडणारे संधी आणि त्या संघामधील दमदार खेळाडू यांमधील चुरस बघायला तेवढीच मज्जा सुद्धा येणार आहे एवढं मात्र नक्की
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant