पिझ्झा डे आणि बरंच काही
जगामध्ये सगळ्या ठिकाणी वापरण्यात येणारे सर्च बार इंजिन म्हणजे गुगल, गुगल नेहमीच काही ना काही वेगळं करण्याच्या धडपडी मध्ये असतं मग त्यामध्ये सण असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेली एखादी घटना यासगळ्यावर गुगलचे खूप चांगले लक्ष असते. फक्त लक्ष नाही तर गुगल अश्या काही मुख्य दिवसातही डुडल सुद्धा बनवतं. डुडल हा एक चित्रकलेचा प्रकार आहे या प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचा तर कधी कधी वेगवेगळ्या डिझाईनचा वापर करून अनेक चित्र रेखाटली जातात. असच काहीस गुगल आज करत आहे. आज गुगल पिझ्झा डे साजरा करत आहे.
गुगल च्या आयकॉन वर क्लिक केले कि, आपल्याला पिझ्झा दिसतो आणि हा पिझ्झा जे वापरकर्त्यांना कट करण्याचा पर्याय मिळतो. या पाठी मागचे कारण सुद्धा गुगल ने दिले आहे. Google ने यावेळी सांगितले आहे की २००७ मध्ये या दिवशी नेपोलिटन “Pizziulo” ची रेसिपी UNESCO च्या प्रतिनिधी यादीत समाविष्ट करण्यात आली होती. गुगलच्या या आयकॉन वर क्लीक केल्यावर तुम्हाला पिझ्झाचे ऑप्शन्स दिसतात आणि हा पिझ्झा किती भागांमध्ये कट केला पाहिजे हे सुद्धा सांगतो. बरोबर रित्या तुम्ही पिझ्झा कट केल्यास गुगल तुम्हाला रेटिंग पॉईंट सुद्धा देतो. आजच्या दिवसाला पिझ्झा डे म्हणून साजरा करत गुगलने खूप भन्नाट कल्पना लावून हे डुडल त्यांच्या युजर्सला दिले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant