Breaking News
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शिवनेर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार रोहन जाधवने पटकाविला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणाऱ्या रोहन जाधवने कस्तुरबा हॉस्पिटलची मधली फळी भक्कम करणारी आक्रमक फलंदाजी केली. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्यासाठी तत्पर असलेली रोहन जाधवची फलंदाजी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांना आव्हानच ठरले.
अंतिम सामन्यात ग्लोबल हॉस्पिटलचे मर्यादित २० षटकात ८७ धावांचे विजयी लक्ष्य स्पर्धेमधील सर्व सामन्यात धावांचे शतक गाठणाऱ्या कस्तुरबा हॉस्पिटल संघाला सोपे होते. परंतु जलद धावा करण्याच्या नादात त्यांचा निम्मा संघ अवघ्या १६ धावांत तंबूत परतला. तेव्हा रोहन जाधवने कस्तुरबा हॉस्पिटलचा किल्ला एकाकी लढल्याचे शिवाजी पार्क मैदानात पाहण्यास मिळाले. रोहनने ४ चौकारांची आतषबाजी करीत प्रत्येक चेंडूवर धाव घेत कस्तुरबा हॉस्पिटलचा धावफलक सतत हलता ठेवला होता. सोळाव्या षटकाला विजया समीप धावसंख्या येत असतांना चौकार मारण्याच्या नादात रोहन जाधव (१९ चेंडूत ३७ धावा) झेलचित झाला आणि कस्तुरबा हॉस्पिटल संघाला केवळ ५ धावांच्या फरकाने विजेतेपदास मुकावे लागले.
आक्रमक फलंदाज अष्टपैलू चेतन सुर्वे, संदीप पाटील, नितेश म्हस्के, सचिंद्र ठाकूर आदी खेळाडूंच्या बलाढ्य रहेजा हॉस्पिटलचे आव्हान संपुष्टात आणतांना रोहन जाधवची संयमी फलंदाजी उपयुक्त ठरली. त्या सामन्यामधील कस्तुरबा हॉस्पिटलचे अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंडे, अष्टपैलू रोहन ख्रिस्तियन, अष्टपैलू अंकुश जाधव, भूषण तांबे यांचा खेळ देखील उत्तम होता
बी डिव्हिजन स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार रोहन जाधवला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आरएमएमएसचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant