ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथील बंद फीवर क्लिनिक सुरु
पनवेल : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक संघ येथील फिवर केंद्र बंद केल्याने वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथील फिवर ओपीडी केंद्र येथे गर्दी होत होती. त्यामुळे बंद असलेले फीवर क्लिनिक सुरु करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने ते केंद्र पुन्हा सुरू केले.
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन गरजेचे आहे. सोशल डिस्टन्स, मास्क बंधनकारक असून गर्दी टाळावी. असे असताना पालिकेने ज्येष्ठ नागरिक हॉल येथे खाली मोहल्ला,साई नगर, ठाणा नाका या विभागातील लोकांसाठी सुरू असलेले फीवर ओपीडी केंद्र बंद बंद करून कोळीवाडा येथे स्थलांतरित केले होते. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथील फिवर ओपीडी केंद्र येथे भरपूर गर्दी होत होती. सदरची आरोग्यविषयक महत्वाची बाब लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेत पाठपुरावा करून नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सदर फीवर ओपीडी केंद्र 2 पुन्हा त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ हॉल येथे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेने ते केंद्र पुन्हा सुरू केले. सदर केंद्राला शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, सारीका भगत, प्रज्योती म्हात्रे, शेकापचे युवा नेते अतुल भगत,मंगेश अपराज यांनी भेट दिली. त्याप्रसंगी तेथे आवश्यक असलेल्या वस्तूंचा विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथे पुन्हा सुरू केलेल्या फीवर क्लिनिकचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 14 NOV TO...
- 14 November, 2024
ADHARSH SWARAJ 24 OCT TO...
- 24 October, 2024
ADHARSH SWARAJ 17 OCT TO...
- 17 October, 2024
ADHARSH SWARAJ 10 OCT TO...
- 10 October, 2024
ADHARSH SWARAJ 03 OCT TO...
- 03 October, 2024
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya