Breaking News
पनवेल ः युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने गावागावात आणि खेडोपाडी क्रिकेट खेळणार्या तरुणांना मोफत क्रिकेट शिकविणे, त्यांना खेळाचे मोफत साहित्य पुरविणे व त्यांच्यातील खरे खेळाडू पारखून त्यांना युवासेना संचालित व क्रिकेट असोसिएशन ऑफ तेलंगणा (सीएटी) तर्फे पुढील प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे सुनील बाबू यांची ही संकल्पना असून ह्यात प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचे योगदान लाभले आहे. आदित्य ठाकरेंच्या आदेशाने युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई व शिवसेना सचिव सुराज चव्हाण यांच्या सुचनेने ही योजना लवकरच युवासेनेच्या माध्यमातून राबविली जावी असे निवेदन युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना दिले. ह्यावेळी सीएटी यांनी दिलेली क्रिकेट बॅट आदित्य ठाकरेंना भेट देण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya