Breaking News
पनवेल ः पनवेलमध्ये एका अल्पवयीन मतिमंद मुलींवर अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल तालुक्यातील एका गावात राहणार्या (17 वर्षीय) मतिमंद मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शारीरिक तपासणी करताना संबधित तरूणी ही सहा आठवड्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे. पीडित अल्पवयीन तरुणीच्या आईने थेट पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठले व प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघांना अटक केले असून या दोघांवरही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya