Breaking News
नवी मुंबई : बँकेत गेलेल्या पतीची वाट पाहत कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत (50) यांची अज्ञात मारेकर्याने कारसह अपहरण करुन हत्या केली. भरदुपारी उलवे परिसरात गोळी झाडून त्यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येच्या घटनेनंतर प्रभावती भगत यांच्याजवळ असलेले दागिने लुटले गेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रभावती भगत यांना मारण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उरणच्या शेलघर भागात रहाणारे बाळकृष्ण भगत हे सोमवारी दुपारी आपली पत्नी प्रभावती भगत यांच्यासह कारने उलवे सेक्टर-19 मधील बँक ऑफ महाराष्ट्र येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी बाळकृष्ण भगत यांनी आपली कार बँक समोरच उभी करुन पत्नी प्रभावती यांना कारमध्ये बसवून ते एकेटच बँकेत गेले होते. यावेळी बाळकृष्ण यांनी कारची एसी सुरु रहावी यासाठी कार सुरुच ठेवली होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने अचनाक त्यांच्या कारमध्ये प्रवेश केला. भगत यांची कार वहाळच्या दिशेने पळवून नेली. यावेळी मारेकर्यासोबत प्रभावती यांची झटापट झाल्याने मारेकर्याने आपल्याकडील रिव्हॉल्वरने प्रभावती भगत यांच्या छातीवर एक गोळी झाडली.
त्यानंतर त्याने कार वहाळ गावाजवळील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस सोडून पलायन केले. दरम्यान बाळकृष्ण जेव्हा एटीमच्या बाहेर आले तेव्हा त्यांची गाडी आढळून न आल्याने त्यांनी मुलास बोलावून घेतले. त्यांचा मुलगा आल्यावर शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी गाडी ज्या दिशेने गेली ते सांगितल्यावर त्या दिशेने जात गाडीची शोधाशोध सुरू करण्यात आली. तोवर भगत यांच्या परिचितांनी गाडीचा शोध घेतला. त्यात कार एटीएम केंद्रापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर सापडली. मात्र त्यात प्रभावती या जखमी अवस्थेत होत्या त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी इमारतीवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya