NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी टोळी जेरबंद

नवी मुंबई ः बनावट चेकद्वारे बंगळुरू येथील हर्बल लाइफ इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या बँक खात्यातील तब्बल चार कोटी 10 लाख रुपये दुसर्‍या बँक खात्यात वळते करून या रकमेचा अपहार करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. 

या प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये रामकिशन पांडे (51), अमिताभ मिश्रा (61), अराफत शेख (33), विनोद भोसले (44), जावेद कुरेशी (55), श्रीजील कुरपम्बील (39) आणि मुकेश गुप्ता यांचा समावेश आहे. अराफत शेख हा वकील असून तोच या गुन्ह्यातील मास्टरमाइंड असल्याचे तपासात आढळून आले.  अराफतने पनवेलच्या आयसीआयसीआय बँकेत सेल्स मॅनेजर असलेल्या मुकेश गुप्ता याच्याकडून त्यांच्या बँकेत सर्वात जास्त व मोठे व्यवहार होणार्‍या हर्बल लाइफ इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या बँक खात्यासह इतर सर्व व्यवहारांची माहिती मिळविली होती. त्यानंतर अराफतने दिल्लीतून हर्बल लाइफ इंटरनॅशनल कंपनीचे बनावट लेटरहेड, डिजिटल सही, शिक्के तसेच बनावट चेक तयार करून घेतले. अमिताभ मिश्रा याने बनावट सहीशिक्क्यांचा वापर करून तयार केलेले लेटरहेड आयसीआयसीआय बँकेत सादर करून हर्बल लाइफ इंटरनॅशनल कंपनीचा बँकेत रजिस्टर असलेला मोबाइल फोन क्रमांक बदली करून घेतला. त्यानंतर रामकिशन पांडे याने आर. के. इंटरप्रायजेसच्या नावाने चार कोटी 10 लाख रुपयांचा तयार केलेला बनावट चेक आयसीआयसीआय बँकेत सादर करून ही रक्कम आर. के. इंटरप्रायजेसच्या नावाने कोपरखैरणे येथील इंड्सइंड बँकेत उघडलेल्या खात्यात वळती करून घेतली. 

या टोळीने हर्बल कंपनीच्या बँकेत असलेला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक बदलला असला तरी हर्बल कंपनीला या व्यवहाराचा ई-मेल पोहोचल्याने हर्बल कंपनीने तत्काळ पनवेल येथील आयसीआयसीआय बँकेला हे व्यवहार थांबविण्यास सांगितले. त्या आधीच टोळीने आर. के. इंटरप्रायजेसच्या बँक खात्यातून चार लाख रुपये काढून घेतले. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेने इंड्सइंड बँकेला उर्वरित चार कोटी सहा लाख रुपयांची रक्कम गोठवून ठेवण्यास सांगून पनवेल शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली.

सदर तक्रारीवरून पनवेल शहर पोलिसांनी तपासात सुरुवात केली. रक्कम गोठवून ठेवल्याबाबत चौकशी करण्यासाठी रामकिशन पांडे आयसीआयसीआय बँकेत गेला असताना, बँकेने त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रामकिशन पांडेला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सहा आरोपींना अटक केली.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट