निशिकांत मोरे प्रकरणाला वेगळे वळण
पीडित युवतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई : विनयभंगप्रकरणी निलंबित केलेले पुणे येथील मोटार विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. मोरे यांच्या विरोधात तक्रार केलेल्या पीडित युवतीच्या सहा नातेवाइकांवर खारघर पोलिसांनी खोट्या तक्रारी दाखल करणे, पोलीस खात्याची बदनामी करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस उपमहानिरीक्षक मोरे यांनी त्यांच्या खारघर येथील एका मित्राच्या अल्पवयीन मुलीसोबत वाढदिवसाच्या समारंभा वेळी गैरकृत्य केल्याच्या तक्रारीवरून मोरे यांच्यावर 26 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यानंतर 9 जानेवारीला मोरे यांचा, खारघर येथून अल्पवयीन मुलीच्या अपहरणात हात नसल्याचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले. सध्या मोरे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पीडित युवतीने आणि तिच्या भावाने, 21 डिसेंबरला मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कर्मचार्यांनी पाठलाग करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला होता. तसेच पीडितेच्या भावाने माझे अपहरण करण्याचा प्रयत्न असून मी लपून बसल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी यानंतर घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले. मात्र, पीडितेच्या नातेवाइकांनी घटना खरी असल्याचा दावा केला होता. ज्या ठिकाणी घटना घडली तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मोरे यांच्याकडे काम करणार्या पोलीसवाहकाचे मोबाइल लोकेशन तपासण्याची मागणी केली होती. याबाबत पोलिसांनी तपास केला असता त्यातही तथ्य आढळले नाही. याप्रसंगी मोरे आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन गेले होते, तर कर्मचारी राकेश गायकवाड मोरे यांची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी मोरे यांच्याविरोधात तक्रार करणार्या पीडित युवतीचे आईवडील आणि भाऊ या ठिकाणी आले आणि गायकवाड यांनाच धक्काबुक्की केली होती. खारघर पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारींवरून सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली असता, निशिकांत मोरे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी याच लोकांनी अपहरण व पाठलाग केल्याचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पीडितेसह आई, वडील, भाऊ यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya