निरोगी बाळासाठी घ्यावायाची काळजी
- by
- Feb 08, 2020
- 1404 views
देशभरात जानेवारी महिना हा राष्ट्रीय जन्म दोष प्रतिबंधक महिना म्हणून पाळला जातो. गर्भधारणेच्या कोणत्याही अवस्थेत जन्म दोष उद्भवू शकतात. बहुतेक जन्म दोष गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत उद्भवतात, या कालावधीत बाळाचे अवयव तयार होतात. सुमारे 3% ते 5% गर्भधारणेत जन्मदोष किंवा अनुवांशिक विकारांमुळे गुंतागुंत होऊ शकते म्हणून गर्भवती महिलांनी गर्भातील दोष टाळण्यासाठी गरोदरपणा दरम्यान कोणत्याही तपासण्या चुकवू नये.
सर्वच गरोदर मातांची स्क्रिनिंग टेस्ट केली जाते. या तपासणीचा उद्देश म्हणजे पोटातील बाळाला असू शकणार्या आजाराच्या लक्षणांचा शोध घेणे. कोणत्याही चिरफाडी विना केल्या जाणार्या या तपासण्या अचूक असतात तसेच बाळ आणि आई दोघांसाठी सुरक्षितही असतात. या तपासण्यांतून बाळाच्या आरोग्याबद्दल तुम्हाला बराच दिलासा मिळू शकतो.
बाळाच्या जन्मापूर्वी केल्या जाणार्या नवकेल ट्रान्स्ल्यूसन्सी स्क्रिनिंग टेस्ट, लेव्हल 2 अल्ट्रासाऊंड, ईनिशियल ब्लड वर्कअप, नॉनएनवेनसिव प्रीनॅटल टेस्ट आणि क्वाड टेस्ट या स्क्रिनिंग टेस्टमध्ये आईच्या रक्ताचा नमुना किंवा अल्ट्रासाउंड चाचणीद्वारे बाळामध्ये काही अनुवांशिक आजार जसे की डाउन सिंड्रोम, मज्जासंस्थेशी निगडित स्पायना बिफीडा आहेत का, याची शक्यता तपासली जाते.
गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतर जन्मदोषांचे निदान केले जाऊ शकते. जन्मजात दोषांपैकी सर्वाज जास्त आढळणारा दोष म्हणजे हृदयदोष, (स्पाइना बिफिडा), फाटलेला ओठ किंवा टाळू. काही निरुपद्रवी आहेत आणि इतरांना आयुष्यभर उपचारांची आवश्यकता असू शकते. मज्जासंस्था किंवा मेंदूच्या समस्या जसे की शारीरिक विकलांग आणि अपंगत्व, दृष्टी कमी होणे, बहिरेपणा, अंधत्व, स्नायू डिस्ट्रॉफी सारख्या चयापचयाशी आणि डीजनरेटिव्ह विकारांसारख्या संवेदनाक्षम समस्यांना कायमस्वरूपी तोंड द्यावे लागते, अशी प्रतिक्रिया डॉ. सुरेश बिराजदार, बालरोग व नवजात विज्ञान, मातृत्व रुग्णालय, खारघर, मुंबई.
खरे तर या आजारांचे निदान होत नसले तरी भ्रूणाला असू शकणार्या अनुवांशिक आजाराची पडताळणी 80% ते 90% पर्यंत अचूकतेने या स्क्रीनिंग टेस्टद्वारे केली जाऊ शकते. सोप्या आणि सुरक्षित असणार्या या तपासण्यांमधून आजाराची शंका तसेच आरोग्यासाठी धोकादायक असणार्या इतर बाबींची कल्पना स्पष्ट होते.
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लैला दवे, सांगतात, ज्या स्त्रिया गर्भावस्थेमध्ये वेळोवेळी तपासणी करत नाहीत, डॉक्टरांचा सल्ला घेत नाही, अशा महिलांच्या गर्भामध्ये दोष आढळण्याची शक्यता अधिक असते. फॉलिक ऍसिडची कमतरता, संक्रमण, सुसंगतता, अनियंत्रित मधुमेह आणि स्टिरॉइड्सचे सेवन करणेही गर्भवती स्त्रियांमधील जन्माच्या दोषांना कारणीभूत ठरू शकते.
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात वेळोवेळी तपासणी केल्यास जन्मदोषांचे निदान केले जाऊ शकते. फॉलिक ऍसिडचे सेवन करा, धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांसारख्या व्यसनांपासून दूर राहा. वजन नियंत्रणात ठेवा. पहिल्या 12 आठवड्यांत डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषधोपचार घेऊ नका, असे डॉ. दवे म्हणाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya