रविवारी वाशीत शूटिंग व्हॉलीबॉल सामने
नवी मुंबई ः नेताजी व्हॉलीबॉल ग्रुप यांच्या वतीने राष्ट्रीय शूटिंग व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन रविवार, 9 फेब्रुवारी रोजी वाशी येथे करण्यात आले आहे. नेताजी व्हॉलीबॉल ग्रुपचे शंकरराव कुतवळ यांनी याविषयी माहिती दिली.
वाशीतील नेताजी मैदान सेक्टर-1 येथे होणार्या शूटिंग व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये पनवेल, गोवंडी, चेंबूर, ठाणे, मुलुंड तसेच नवी मुंबई परिसरातील असेे एकूण 25 व्हॉलीबॉल संघ सामील होणार आहेत. स्पर्धेत विजेता संघाला रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या संघाला 10,000 हजार, द्वितीय क्रमांक संघाला 5,000 हजार रोख रक्कम व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या स्पर्धेत नामवंत व्हॉलीबॉलपटू सहभाग घेणार आहेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्ञानेश्वर सांगळे व प्रमोद शिवपुजे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya