Breaking News
लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन आणि WHRAF तर्फे वह्या-पेन वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
मुंबई -लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 ए 1, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन, आणि वर्ल्ड वाईड ह्युमन राईट्स अॅण्ड अँटी करप्शन फोरम (sंप्RAइ) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सचिदानंद को-ऑप हौसिंग सोसायटी, गं. द. आंबेकर मार्ग, काळेवाडी, परळ, मुंबई येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वही आणि पेन सेट, फोल्डर तसेच बिस्किट वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाचे मार्गदर्शन sंप्RAइ चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे व पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 25/26 लायन फिरोझ कात्रक (माजी शरिफ मुंबई व पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथराव हेगडे आणि sंप्RAइ अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.
या वेळी उपस्थित इतर मान्यवरांमध्ये: लायन्स क्लब रिजन चेअरपर्सन लायन सूर्या कनाल, sंप्RAइ चे राष्ट्रीय अध्यक्ष व लायन्स क्लब मिडटाऊनचे सचिव लायन जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ, घ्प्Rध् चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अफसर कुरेशी, डिस्ट्रिक्ट अॅक्टिव्हिटी चेअरपर्सन लायन विजय रायमाने, खजिनदार लायन विलास डांगे , sंप्RAइ महाराष्ट्र सरचिटणीस श्री. अमोल वंजारे, मुंबई अध्यक्ष श्री. प्रकाश वाणी, चिटणीस श्री. सचिन भांगे, सौ. प्रमिला अडसूळ, लायन महेश आंब्रे, लायन राजेश कांबळे, लायन सचिन राऊत, लायन अशोक पवार, लायन दिलीप वरेकर, लायन नितीन कोलगे, लायन प्रज्ञा बाईत, श्री. सुनील नागवेकर, श्री. नितीन पन्हाळकर, श्री. महेश सरफरे, श्री. लितेश केरकर व इतर अनेक पदाधिकारी, सदस्य व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन आणि sंप्RAइ चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे उपस्थित नागरिकांनी व पालकांनी विशेष अभिनंदन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar