Breaking News
नाशिकमध्ये वृक्षारोपण आणि अंशतः अनुदानित शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी जनहित लोकशाही पार्टीकडे पाठपुरावा
नाशिक - रविवार, 27 जुलै 2025 रोजी नाशिक परिक्षेत्रातील निसर्गरम्य चामर लेणी, बोरगड परिसरात केयरिंग हॅण्ड अँड सोशल संस्था यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शेकडो वृक्षांचे रोपण करण्यात आले. केयरिंग हॅण्ड अँड सोशल संस्था ही समाजहितासाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था असून पर्यावरण रक्षणासाठी त्यांच्या विविध उपक्रमांपैकी हा वृक्षारोपण उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला.
या कार्यक्रमाला जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अशोकराव आल्हाट, नाशिक महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक मा. श्री. विवेक भदाणे, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. उमेश बोरसे, व्यावसायिक श्री. गुलाबजी पंजवानी, साधना मिसळचे संस्थापक श्री. आमलेजी, के.हॅण्ड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विवेक सिंह, सचिव श्री. निखिल जाधव, महिला झोनल प्रमुख सौ. रेणू ओंकार, प्रा. कर्तारसिंह ठाकुर, श्री. भाऊसाहेब ठाकरे तसेच कोचरगाव (ता. दिंडोरी) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे याचे महत्त्व आपल्या मनोगतातून उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कर्तारसिंह ठाकुर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. रेणू ओंकार यांनी केले.
शिक्षकांनी मांडला आपला न्यायाचा मुद्दा
कार्यक्रमानंतर मागील 25 वर्षांपासून विना तथा अंशत अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक बांधवांनी आपले वाढीव वेतन अनुदान मिळावे या मागणीसाठी जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोकराव आल्हाट यांची भेट घेतली. त्यांनी 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार टप्पावाढ यथास्थित लागू करून 20ज्ञ् वाढीव वेतन अनुदान तात्काळ देण्याची मागणी केली. या वेळी मा. अशोक आल्हाट साहेबांनी या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्रालयात भेट घेऊन तातडीने चर्चा करू, असे आश्वासन दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar