Breaking News
सरकारकडून ‘मोतीबिंदू मुक्त राज्य’ मोहिम सुरू
जालना -आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी राज्य सरकारने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम सुरू केली आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज सांगितले. “सरकार संपूर्ण महाराष्ट्रात मोतीबिंदू मुक्त राज्य निर्माण करण्यासाठी आणि आरोग्य सेवा वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री म्हणाल्या.
महाराष्ट्रातील नागरिकांचे नेत्रस्वास्थ सुधारण्यासाठी तसेच वाढत्या मोतीबिंदुची संख्या व सर्वसामान्य आणि गरीब जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने अंधत्व निर्मूलनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ‘मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम जिल्हा सामान्य रुग्णालय व कर्मवरी मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. ही मोहीम 22 जुलै ते 22 ऑगष्ट २०२५ या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदु रुग्णावर मोफत उपचार केले जाणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar