कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये DOMO Inc. च्या सहकार्याने ‘डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना
कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये DOMO Inc. च्या सहकार्याने ‘डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना
पुणे – कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, उद्योगाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, DOMO Incorporation च्या सहकार्याने डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना केली आहे. या केंद्राचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले.
DOMO ही संस्था जगातील टॉप ५ डेटा सायन्स कंपन्यांपैकी एक असून, या केंद्रासाठी DOMO हा अधिकृत उद्योग भागीदार आहे. या उपक्रमांतर्गत कीस्टोनच्या विद्यार्थ्यांना डेटा सायन्सचे कौशल्य प्रशिक्षण, इंटर्नशिप, तसेच उद्योग आधारित प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे, जे त्यांना उद्योगाच्या गरजेनुसार तयार करण्यात मदत करेल.
उद्घाटनप्रसंगी अश्फाक शेख, डायरेक्टर DOMO इंडिया आणि कृष्णात पवार, DOMO चे प्रॉडक्ट एक्स्पर्ट उपस्थित होते. त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी डेटा सायन्समधील करिअरच्या संधींबाबत माहिती दिली आणि DOMO ची कार्यपद्धती समजावून सांगितली.
या कार्यक्रमास प्रा. यशोधन सोमण, संस्थापक संचालक, डॉ. संदीप कदम, प्राचार्य, अंकित लुनावत, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. कदम यांनी कीस्टोनच्या उद्योगसिद्ध अभियंते घडवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि DOMO सोबतची ही भागीदारी अभ्यासक्रम आणि उद्योगातील गरजांमधील अंतर कमी करण्यात उपयुक्त ठरेल असे सांगितले.
या वेळी डेटा सायन्स लॅबोरेटरी आणि अभ्यासक्रमाचे ब्रॉशर यांचेही उद्घाटन करण्यात आले. प्रा. स्वाती पनेरी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन उत्कृष्टपणे पार पाडले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. यशोधन सोमण यांनी सर्व टीम सदस्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्सच्या यशस्वी स्थापनेबद्दल सर्वांना अभिनंदन दिले.
हा उपक्रम कीस्टोनच्या उद्योगाभिमुख शिक्षणाचे वचन आणि विद्यार्थ्यांना भविष्याची तयारी करून देण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
फोटो ओळ – कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथे DOMO Incorporation च्या सहकार्याने डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटन प्रसंगी डॉ शिर्के,प्रा.यशोधन सोमण, श्री कृष्णत, प्रा.स्वाती पनेरी, श्री अशफाक, प्राचार्य डॉ संदीप कदम, प्रा राजेभोसले, प्रा महेंद्रकर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar