Breaking News
शादी डॉट कॉमवरुन भेटलेल्या महिलेची 3 कोटी 60 लाखांची लुबाडणूक
पुणे - पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल साईटवरून 3 कोटी 60 लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं खरे नाव अभिषेक शुक्ला असून तो मूळचा लखनऊचा आहे. शादी डॉट कॉम या प्रसिद्ध मॅट्रिमोनिअर साईटवरून हे दोघे भेटले होते. फेक प्रोफाईल तयार करून या व्यक्तीनं महिलेस फसवल्याचं समोर आलं. या प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्लीतील एक महिला पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्याला असताना, तिची ऑनलाईन एका प्रोफाइलवरून ओळख ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ या नावाने स्वतःला ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणवणाऱ्या व्यक्तीशी झाली. ओळखीनंतर मैत्री, आणि नंतर लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने महिलेशी जवळीक वाढवली. महिला आणि आरोपी यांनी काही काळ एकत्र वास्तव्यही केलं.
महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून 5 कोटी रुपयांची पोटगी मिळालेली होती. ती आपल्या व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणूक करत होती. ही माहिती मिळताच आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं आमिष दाखवलं. फसवणुकीचा बनाव रचला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar