Breaking News
आरपीआय कार्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी
मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या सीएसटी येथील कार्यालयामध्ये मुनिसिपल मजदूर संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साह मध्ये साजरी करण्यात आली. या प्रसंगी पर्यावरण विभागातील मुंबई अध्यक्ष विजय शेट्टी, दक्षिण मुंबई जिल्हा सचिव विजय जाधव, केंद्रीय कार्यालय सचिव दादासाहेब जाधव, दीपक वाघमारे, नरेंद्र मोहिते,पत्रकार सलीम खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व समाजाला घेऊन चालणारी पार्टी तसेच समाजात सलोखा राखण्याचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करत असते अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक शिरीष भाई चिखलकर यांनी दिली आणि उपस्थितांचे आभार मानले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर