Breaking News
3 हजार कार वाहून नेणाऱ्या महाकाय जहाजाला जलसमाधी
चीनहून मेक्सिकोकडे जाणाऱ्या मॉर्निंग मिडास नावाच्या कार्गो शिपला आठवडाभरापूर्वी प्रशांत महासागरात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जलवाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या जहाजावर तब्बल 3000 नव्याकोऱ्या कारची वाहतूक केली जात होती. या कारमध्ये 70 इलेक्ट्रिक व्हेइकल, 680 हायब्रिड कार होत्या. या मालवाहू जहाजाला आग लागल्यानंतर जहाजातील क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेत एकूण 22 क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आले. जवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजाने त्यांना सुरक्षितपणे वर काढलं.
मिळालेल्या माहितीनुसार हे महाकाय जहाज चीनहून निघाले होते. ते मेक्सिकोला जात होते. मात्र मध्येच प्रशांत महासागरात असतानाच या जहाजाला अचानक आग लागली. ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात होता. पण ती विझविण्यात यश आले नाही. परिणामी हे आता समुद्रात बुडून गेले आहे.ही दुर्घटना अलास्का येथे अलेउतियन द्वीप समुहाजावळ घडली आहे.
मॉर्निंग मिडास हे व्यापारी जहाज मेक्सिकोला जात होते. मात्र 3 जून रोजी या जहाजाला आग लागली. हे जहाज Adak Islandच्या जवळपास 490 किमी दूर होते. त्यावेळीच या जहाजाला आग लागली होती. ही आग एवढ्या वेगाने पसरली की तिला पूर्णपणे विझविता आले नाही. आगीचा भडका उडाल्यामुळे ते पुर्णपणे निष्क्रिय झाले. परिणामी आग लागल्याच्या काही दिवसांनंतर हवामान खराब झाल्याने आणि जहाजात पाणी शिरल्याने ते समुद्राच्या पाण्यात बुडून गेले. मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज 5000 मीटर खोल समुद्रात बुडाले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade