Breaking News
16 अब्जाहून अधिक पासवर्ड झाले लिक
Google, Apple आणि Facebook अकाउंट वापरणाऱ्या तब्बल 16 अब्ज लोकांची गोपनीयता धोक्यात आली आहे. 16 अब्ज लोकांचे पासव्रज आणि लॉग-इन क्रेडेंशिअल्स चोरण्यात आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे. डार्क वेबवर 16 अब्जांहून अधिक क्रेडेन्शियल्स ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असं सायबरसुरक्षा संशोधकांना आढळून आलं आहे. एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, जर यावर वेळीच उपाय केला गेला नाही तर लोकांना फिशिंग अटॅक, आयडी चोरी आणि त्यांच्या खात्यांवरील नियंत्रण देखील गमावावे लागू शकते.
या डेटा लीकमुळे सायबर गुन्हेगारीला चालना मिळण्याची शक्यता आहे. सुमारे 30 मोठ्या डेटा सेट्समध्ये लाखो ते अब्जावधी लॉगिन तपशील असून, एकूण संख्या 16 अब्जांहून अधिक आहे. डार्क वेबवर हा डेटा मर्यादित तांत्रिक ज्ञान आणि कमी पैशांत उपलब्ध आहे, ज्यामुळे सामान्य व्यक्तींपासून ते कंपन्या आणि संस्थांपर्यंत सर्वच असुरक्षित बनले आहेत.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या तपासात सहभागी असलेल्या संशोधकांचा असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात पासवर्ड लीक होण्यासाठी अनेक इन्फोस्टेलर मालवेअर जबाबदार आहेत. पासवर्ड चोरी होणं ही काही छोटी बाब नाही, त्यामुळे अनेक धोके उद्भवू शकतात. म्हणूनच आता गुगलने त्यांच्या अब्जावधी युजर्सना त्यांचे अकाउंट पासवर्ड तात्काळ बदलण्याचा आणि पासकी वापरण्याचा सल्ला दिला आहे.
गुगलने यूजर्ससाठी महत्त्वाचे
गुगलने यूजर्सला पारंपरिक पासवर्डऐवजी पासकीजसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. एफबीआयने एसएमएस किंवा ईमेलद्वारे येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे. सायबर सुरक्षा तज्ञांनी सर्व प्रमुख खात्यांचे पासवर्ड बदलणे, मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड वापरणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे आणि पासवर्ड मॅनेजर ॲप्सचा वापर करण्याची शिफारस केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade